// राग //
रागात बदलते जागा..
रागात वाढतो त्रागा..
पकडून रागाचा धागा..
शब्द चार सुनावतो बघा..!!
असता राग आंधळा..
चौखूर उधळतो घोडा..
राग असता पांगळा..
मौनात करी राडा..!!
डरपोक कुणाचा राग..
चालवी तोंड पट्टा..
रागात कधी कुणाच्या..
करितसे कोणी थट्टा..!!
रागाचे विविध प्रकार..
राग उलटवते सरकार..
राग करी सर्वनाश..
राग संवेदनशील फार..!!
नको रागात त्रागा..
ठेवा प्रेमास जागा..
करा प्रेमाचा गुणाकार..
रागास तुम्ही भागा..!!
बोललो मी काही..
नका धरू राग..
मैत्री आपली लईभारी..
असू द्या अनुराग..!!
*चकोर*
रागात बदलते जागा..
रागात वाढतो त्रागा..
पकडून रागाचा धागा..
शब्द चार सुनावतो बघा..!!
असता राग आंधळा..
चौखूर उधळतो घोडा..
राग असता पांगळा..
मौनात करी राडा..!!
डरपोक कुणाचा राग..
चालवी तोंड पट्टा..
रागात कधी कुणाच्या..
करितसे कोणी थट्टा..!!
रागाचे विविध प्रकार..
राग उलटवते सरकार..
राग करी सर्वनाश..
राग संवेदनशील फार..!!
नको रागात त्रागा..
ठेवा प्रेमास जागा..
करा प्रेमाचा गुणाकार..
रागास तुम्ही भागा..!!
बोललो मी काही..
नका धरू राग..
मैत्री आपली लईभारी..
असू द्या अनुराग..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment