।। का अजुन आहे ।।
पेटविल्या कैक मशाली..
तिमिर का अजुन आहे..??
मराठ्यांच्या एकजुटीला..
गालबोट का अजुन आहे..??
पर्मार्थाची पावन भूमि..
स्वार्थात का भिजुन आहे..??
सुसंस्कारी मन आपले..
कुकर्मात का थिजुन आहे..??
एक असली माता जरी..
लिंगभेद का रुजुन आहे..??
सर्व समावेशक भांड्यात..
जातीयता का शिजून आहे.??
संतांचा सहवास आपणा..
ढोंगी का पुजून आहे..
सुधारकांच्या ह्या भूमित..
अनिष्ट का सजुन आहे..??
पुरोगामी म्हणवतो आम्ही..
संकुचित का अजुन आहे..??
प्रश्न पडतात कैक असे..
अनुत्तरित का अजुन आहे..??
*चकोर*
पेटविल्या कैक मशाली..
तिमिर का अजुन आहे..??
मराठ्यांच्या एकजुटीला..
गालबोट का अजुन आहे..??
पर्मार्थाची पावन भूमि..
स्वार्थात का भिजुन आहे..??
सुसंस्कारी मन आपले..
कुकर्मात का थिजुन आहे..??
एक असली माता जरी..
लिंगभेद का रुजुन आहे..??
सर्व समावेशक भांड्यात..
जातीयता का शिजून आहे.??
संतांचा सहवास आपणा..
ढोंगी का पुजून आहे..
सुधारकांच्या ह्या भूमित..
अनिष्ट का सजुन आहे..??
पुरोगामी म्हणवतो आम्ही..
संकुचित का अजुन आहे..??
प्रश्न पडतात कैक असे..
अनुत्तरित का अजुन आहे..??
*चकोर*
No comments:
Post a Comment