::// मी मनाचा //::
मन मनाशी संवाद साधतो मी..
कधी मन बोलेते, तर कधी मी..
चक्क एकमेकांशी भांडतो आम्ही..
कधी मन जिंकते, तर कधी मी..!!
येता मज गहिवर मन उदास होई..
होता प्रसन्न मन, आनंदून जातो मी..
नसता कोणी सवे, मन साथ देई..
गुंज मनाचे करता, रमतो मनासवे मी..!!
नसतो विसंवाद कधीच कोणात..
रागास ना कधी,थारा देत आम्ही..
एक मते ठाम, निर्णय घेतो आम्ही..
म्हणूनच तर..
मन माझे, अन मनाचा असतो मी..!!
*चकोर*
मन मनाशी संवाद साधतो मी..
कधी मन बोलेते, तर कधी मी..
चक्क एकमेकांशी भांडतो आम्ही..
कधी मन जिंकते, तर कधी मी..!!
येता मज गहिवर मन उदास होई..
होता प्रसन्न मन, आनंदून जातो मी..
नसता कोणी सवे, मन साथ देई..
गुंज मनाचे करता, रमतो मनासवे मी..!!
नसतो विसंवाद कधीच कोणात..
रागास ना कधी,थारा देत आम्ही..
एक मते ठाम, निर्णय घेतो आम्ही..
म्हणूनच तर..
मन माझे, अन मनाचा असतो मी..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment