Friday, 16 May 2014

// दोन घडीचा डाव //




// दोन घडीचा डाव //

आरोप सखे कुठे राहिले..
हे तर माझे प्रारब्ध झाले..
अपराध असे काय झाले..
सजा भोगणे नशिबी आले..!!

प्रेम तुजला कधी न कळले..
आता स्वतःस जाळणे आले..
कसली मग ती प्रेम कवने..
कंठासी आता पोळणे आले..!!

खेळ तुझे हे असे झाले..
खेळणे का मग माझे झाले..
विरहाचे धग ते कसले..
आता हात शेकणे आले..!!

डाव मांडला दोन घडीचा..
फासे उलटे पड़णे आले..
प्रेमाच्या डावात सखे..
मात खाणे नित्य झाले..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment