

==============
|| पाकळ्या ||
==========
विखुरल्या पाकळ्या
वेचल्या
ओंजळीत धरल्या..
भरता श्वासात
मंद गंधळल्या
म्हणाल्या..
ह्या
गंधानेच केलाय घात..
तोडण्या कळीस
सरसावतात अनेक हात
कोणी सजवतात घरात
कोणी देवघरात..
कोणी मढ्यावर झोकून देतात..
कोणी नुसतेच हुंगतात
अन फेकून देतात..!!
किती
भरल्यास तू ओंजळीत जरी
विखुरल्या पाकळ्या
ना फुलात पुन्हा बदलणार..
सुकल्या पाकळीचा गंध
सांग
किती काळ टिकणार..??
नव्हते
काहीच उत्तर
पाकळ्यांच्या प्रश्नावर
उत्तरलो मोघम
म्हणालो,
ठाऊक आहे मज
विखुरल्या पाकळ्यांचे
ना फुल पुन्हा
कधीच फुलणार..
पण
इतकेच मी सांगेन तुला
गंध वेडा जरी मी
तसाचं
ना पाकळीसही दुखावणार..
ना कधीच सुकू देणार
जरी ओसरला बहर..
भरली ही ओंजळ पाकळ्यांची
ना देव्हारी
ना घरात
ना मढ्यावर
ना रस्त्यात
तुला दिसणार..
मनाच्या कु्पीत ती
हळुवार
जतन केलेली असणार..
अन हे ही तितकेच खरे
गंध रुपात फुला
तू हृदयी चिरंतर असणार..!!
***सुनिल पवार....


No comments:
Post a Comment