Tuesday, 20 December 2016

|| अधून मधून म्हणते ती ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| अधून मधून म्हणते ती ||
=================
अधून मधून म्हणते ती
काय जीवन आहे
एक ना धड भाराभर
नाही कसली आवड..
ना नेलं कधी फिरायला
जळलं मेलं लक्षण
विचारावं कधी तर
एकच पालुपद
आहे कुठे सवड..?

आज,
तो ही पेटला इरेला
म्हणाला
चल
तू भी क्या याद करेगी
ही बघ काढली सवड..
मस्त जाऊ फिरायला
आता मात्र बाहेर पड..!!
म्हणाली ती तात्काळ
छान.!
काढते मी सवड
पण हो
आधी जेवण हवं करायला
एक काम कर ना
एव्हडी भाजी घे निवडायला..!!
निवडून दिली भाजी त्याने
म्हणाला
चल आटप लवकर..
चौपाटीवर जाऊ
क्षितीजाच्या रंगात न्हाऊ
मावळतीचा दिनकर पाहू..!!
म्हणाली ती त्यावर
अरे थांब ना जरा
इतकी घाई कशाला..?
स्वयंपाक घेते करून
मुलं येतील भुकेली
जरा कुकर घे लावायला..!!
लावून दिला कुकर त्याने
म्हणाला
होईल इतक्यात शिट्टी..
आवरून घे लवकर
नाहीतर,
उडतील रंग क्षितीजाचे
अन
पसरेल काळोख सागरतटी..!!
हसली ती
म्हणाली,
तू आहेस ना रंग भरायला
मग काळजी कशाला..?
इतकी भांडी घासून घेते
थोडी
झाडलोट उरकून घेते
तोवर तू ही घे ना जरा
झाला पसारा आवरायला..!!
आवरता आवरता
दिवस संपला
पण तिची काम काही संपेनात
म्हणाली
आज राहू दे ना
पुन्हा कधी जाऊ..
नाराज नको होऊ
मुलं येतीलच इतक्यात
आली की
जेवण उरकून घेऊ..!!
अधून मधून म्हणते ती
काय जीवन आहे..!!
***सुनिल पवार...✍🏽😜

No comments:

Post a Comment