Thursday, 1 December 2016

|| कविता ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| कविता ||
========
म्हणाली ती
काय कवी.!
आज कविता नाही..??
हरवली का तुमची
कवितांची वही..?
का संपली सांगा
पेनातील शाई..??
हेच कारण
का आणखी काही..??

मी हसलो
म्हणालो,
प्रश्न तुझा ग गौण आहे
शब्द जरा मौन आहे..
बोलते हृदयाची धडधड
आतुर प्रत्येक क्षण आहे..
घेऊन बघ ठाव मनाचा
कागद तुझ्या समोर आहे..
वाचून बघ डोळ्यात माझ्या
समजेल तुला
कविता माझी कोण आहे..??
****सुनिल पवार...✍🏽😊

No comments:

Post a Comment