|| तू भेटलीस नव्याने ||
==============
तू भेटलीस नव्याने
सुरांच्या सुरावटीने..
अलगुजाच्या श्वासाचे
सजले सुरेल गाणे..!!
==============
तू भेटलीस नव्याने
सुरांच्या सुरावटीने..
अलगुजाच्या श्वासाचे
सजले सुरेल गाणे..!!
मी तल्लीन त्या स्वरात
नुरले भान स्वतःचे..
तू गीत ऐसें छेडिले
रंग ऋतू स्वागताचे..!!
कैफात रागदारीच्या
आलाप सजत गेला..
मैफिल चांदरातीची
पुनवेचा रंग त्याला..!!
सप्तसुरांच्या संगमी
असा एकरूप झालो..
तू उधळलेस मोती
मी झेलीत चिंब न्हालो..!!
****सुनिल पवार...
✍🏽
नुरले भान स्वतःचे..
तू गीत ऐसें छेडिले
रंग ऋतू स्वागताचे..!!
कैफात रागदारीच्या
आलाप सजत गेला..
मैफिल चांदरातीची
पुनवेचा रंग त्याला..!!
सप्तसुरांच्या संगमी
असा एकरूप झालो..
तू उधळलेस मोती
मी झेलीत चिंब न्हालो..!!
****सुनिल पवार...

No comments:
Post a Comment