


=============
|| मायेची घागर ||
===========
काल ती
चिडली मुलांवर
म्हणाली,
बघा कोणीच ऐकत नाही..
आणि हो..
तुम्ही ही तसेच ढिम्म
तुमचंही त्यांच्याकडे लक्ष नाही..!!
मी हसलो म्हणालो,
खरं सांगायचं तर
तू असताना
त्याची काहीच गरज नाही..
तुझ्याच डोळ्यांनी तर
पाहतोय सारं
अन
समजून घेतोय बरंच काही..!!
ती चिडली पुन्हा
म्हणाली,
कळतंय पण वळत नाही
अशीच तुमची गत आहे..
माझ्या बाबतीत उदासीनता
बाकी सारंच अवगत आहे..!!
मी हसलो पुन्हा
म्हणालो,
उदासीनता नाही सखे
ही सजगता आहे..
कारण राग हा क्षणिक असतो
पण
निखारा मात्र धगधगता आहे..!!
अन मुलांचं म्हणशील तर,
माझ्या तोंडसुख घेण्याने
ते बिथरतील कदाचित
पण
तुझ्या ओरडण्याचे
दुःख त्यांना होणार नाही..
कारण मायेची घागर अनमोल
आईशिवाय
कोणीच कधी भरणार नाही..!!
*****सुनिल पवार....



No comments:
Post a Comment