Thursday, 1 December 2016

|| संसार ||

💝तिच्यातील ती💝
=◆●◆=◆●◆=◆●◆=
|| संसार ||
=======
तिच्या हातातील
वही पेन पाहून
तिला छेडायची लहर आली..
म्हणालो
आज वाऱ्याने
कशी काय दिशा बदलली..
चक्क कवितेनं
कवितेशी सलगी केली..??

ती हसली म्हणाली,
तुमच्या सारखी नाही जमत
कागदावरची शाब्दिक वरात..
पण
मेळ साधतेय साधनांचा
अन पाहतेय
काय हवं नको ते घरात..!!
मी चपापलो
सावरत म्हणालो
तेच म्हणायचं होतं ग मला
म्हणजे,
मेळ बसतोय ना व्यवस्थित..?
जमतंय ना खर्चाचे गणित
कितीसे श्रोते आहेत
आजला उपस्थित..??
ती पुन्हा हसली
म्हणाली
तशी उपस्थिती तुरळक आहे..
त्यात
परफॉर्म भी सुमार आहे..
तोंड बाकी चार आहेत
अन विवंचना भरमार आहे..!!
मी स्तब्ध झालो जरा
अन वदलो पुन्हा
आता तुझ्यावर सारी मदार आहे..
खात्री आहे
काबिल माझे सरकार आहे..
आणि खरं सांगायचं तर
कवितेविना कवीचा
शून्य संसार आहे..!!
***सुनिल पवार...✍🏽😊

No comments:

Post a Comment