Thursday, 1 December 2016

|| उशीर ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| उशीर ||
======
उशीर झाला जरासा
तिला निमित्त मिळालं चिडायला
म्हणाली,
मला आवडत नाही वाट बघायला
काय झालं होतं
जरा लवकर निघायला..??

म्हटलं मी
निघायचं होतंच लवकर
म्हणून तर
गजर लावला मोबाईलला..
नेमक्या वेळेस नाही वाजला
हा काय दोष माझा झाला..??
तसा निघणारच होतो लवकर
पण
नेमकं पाणी नव्हतं नळाला..
म्हणून वेळ झाला अंघोळीला
हा काय दोष माझा झाला..??
तरी लवकरच उरकली अंघोळ
अन कपडे टाकले इस्त्रीला..
इस्त्रीवाल्याने वेळ खाल्ला
हा काय दोष माझा झाला..??
तसे चढवले कपडे घाईतच
धावत आलो बस स्टॉपला..
नेमकी बस निघून गेली
हा काय दोष माझा झाला..??
उसंत मिळाली नाही जरा
धावावं लागलं ट्रेन पकडायला..
तुझ्याच साठी प्रयास केला
हा काय दोष माझा झाला..??
हसली ऐकून कारणं सारी
म्हणाली,
जमतंय बरं हा सारवायला..
पण वेंधळाच आहेस जमणार कधी.?
माझ्या विना घरी वावरायला..!!
*****सुनिल पवार...😊✍🏽

No comments:

Post a Comment