Tuesday, 20 December 2016

|| परिभाषा ||


💝तिच्यातील ती💝
==============
|| परिभाषा ||
=========
बिलगली वेल
तरुवरास
अन
कळली
"आतुरता"
ह्या शब्दाची
परिभाषा..
निरव
शांततेतील
ती
मौनाची
अजोड अवीट
प्रेमभाषा..!!

भ्रमराने केले
गुंजराव
फुलांशी
अन
उमगली
तयाची
ती
आर्जवी "अभिलाषा"..
मिटून घेता
भ्रमरास
फुलाने
पल्लवित
नयनात
स्वप्नील आशा..!!
**सुनिल पवार...✍🏽😊

No comments:

Post a Comment