Tuesday, 20 December 2016

II पहाटेच आगमन II

🌺सुप्रभात🌺
==========
नित्य ओळखीची भासते
परी निराळीच ती असते..
कधी दवात भिजून येते
कधी मुक्त किरणात न्हाते..!!


कधी कळतच नाही
ती धुके पांघरून येते..
शीतलता रुजवून मनात
ती उबारा क्षणात देते..!!

प्रसन्नतेचा ताज डोईवर
ती फारच मोहक दिसते..
पहाटेच आगमन सुहास्य
तन मनात रोमांच फुलवते..!!
*****सुनिल पवार...✍🏽

No comments:

Post a Comment