=============
सहज गप्पांच्या ओघात ती बोलून गेली..
काळजातला हळवा कोपरा टटोलून गेली..
काळजातला हळवा कोपरा टटोलून गेली..
म्हणाली,
हळूहळू संपणाऱ्या ह्या प्रवासात,
आयुष्याच्या एका वळणार
असं वाटू लागते की,
पुनश्च करावा प्रवास
नव्या उमेदीने, नव्या ध्येयाने
तोच जुना रस्ता खुणावू पाहतो
नव्या स्वरूपात भेटू पाहतो..
हळूहळू संपणाऱ्या ह्या प्रवासात,
आयुष्याच्या एका वळणार
असं वाटू लागते की,
पुनश्च करावा प्रवास
नव्या उमेदीने, नव्या ध्येयाने
तोच जुना रस्ता खुणावू पाहतो
नव्या स्वरूपात भेटू पाहतो..
मी हसलो, म्हणालो,
तसा रोजच असतो गं नवा प्रवास
मात्र अंगवळणी पडलेले रस्ते,
सहजा सहजी सुटत नसतात..
तसेच, भुलवणारे चकचकीत दिसणारे
सारेच रस्ते
दिसतात तसे मुळीच नसतात...!!
तसा रोजच असतो गं नवा प्रवास
मात्र अंगवळणी पडलेले रस्ते,
सहजा सहजी सुटत नसतात..
तसेच, भुलवणारे चकचकीत दिसणारे
सारेच रस्ते
दिसतात तसे मुळीच नसतात...!!
अन् आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
प्रत्येक वाटसरूच्या वाट्याला,
असे रस्ते येतच असतात..
मात्र योग्य त्या दिशेने जाणारे,
आपल्या मुक्कामी पोहचवणारे
नेमके रस्ते
आपणच आपले निवडायचे असतात..!!
***सुनिल पवार...✍🏽
प्रत्येक वाटसरूच्या वाट्याला,
असे रस्ते येतच असतात..
मात्र योग्य त्या दिशेने जाणारे,
आपल्या मुक्कामी पोहचवणारे
नेमके रस्ते
आपणच आपले निवडायचे असतात..!!
***सुनिल पवार...✍🏽

No comments:
Post a Comment