|| कसे जमते तिला ||
=============
कसे जमते तिला
प्रत्येकाची
आवड जोपासायला..?
कुतूहलापोटी का होईना
तिचे मन हवे तपासायला..!!
ह्याला हे आवडते
त्याला ते आवडते
हे पक्के तिला कळते..
पण प्रश्न असा आहे
ह्या सर्वात ती
स्वतःस का वगळते..??
मी सहज विचारले तिला
अन
ती हसली त्यावर केवळ..
तिच्या हसण्यातून झाली नकळत
माझ्या प्रश्नाची उकल..!!
****सुनिल पवार...
✍🏽

=============
कसे जमते तिला
प्रत्येकाची
आवड जोपासायला..?
कुतूहलापोटी का होईना
तिचे मन हवे तपासायला..!!
ह्याला हे आवडते
त्याला ते आवडते
हे पक्के तिला कळते..
पण प्रश्न असा आहे
ह्या सर्वात ती
स्वतःस का वगळते..??
मी सहज विचारले तिला
अन
ती हसली त्यावर केवळ..
तिच्या हसण्यातून झाली नकळत
माझ्या प्रश्नाची उकल..!!
****सुनिल पवार...



No comments:
Post a Comment