Wednesday, 7 December 2016

|| साधना ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| साधना ||
========
ती हसत म्हणाली,
पुरे झाला प्रेमालाप..
आता हरी नाम जप
लाव शब्दांना सवय
त्यांनाही करू दे तप..!!

मी ही हसलो म्हणालो
हे तपच आहे सखे
पण
तुला तसे कळणार नाही..
एक लक्ष,एक ध्यास
साधना माझी ढळणार नाही..!!
ती पुन्हा हसली
चिडवत म्हणाली,
गळलेल्या पांनानी उगाच
हिरवाईची स्वप्न पाहू नयेत..
केवळ हिरव्या देठाने
इतकेही हुरळून जाऊ नये..!!
मी हसून उत्तरलो
गळणारे पानही
मस्त वाऱ्यावर लहरत
अलगद जमिनीवर उतरते..
बघ ना
मातीशी एकरूप होत
नव्या रुजवातीचे
ते ही सबळ कारण ठरते..!!
अन
आता हेच बघ ना
स्पष्ट दिसतंय
त्या पाणीदार डोळ्यात..
तुझ्या मनाच्या पुस्तकातील
तू जपलेलं प्रेमाचं
जाळीदार सुंदर पान..🌿
अन त्यावर रेखाटलेलं ते
आपल्या स्वप्नांचं
त्यातीलच एक चित्र छान..!!
****सुनिल पवार...✍🏽😊

No comments:

Post a Comment