Thursday, 23 May 2019

थोडसं मनातलं..

थोडसं मनातलं..

पाऊस 
केव्हाचा पडून गेलाय
आभाळही 
आता लख्ख झालंय
मोहरली असशील ना तू?
नवा साजही 
लेवून घेतला असशील..!!

तृप्तही झाली असशील
कदाचित 
साठवण्याची क्षमताही नसेल
कदाचित 
त्याची आवश्यकताही नसेल..!!

पण तरीही
धरली ओंजळ तू सोडू नको
बघ ना 
अजूनही काही झिरपते आहे
थोडसं मनात राहिलेलं..!!
--सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment