Thursday, 23 May 2019

खटकतं मला...

खटकतं मला...😢
हल्ली खटकतं मला
तुझं निष्ठूर वागणं
अन् माझं लाचार जगणं..
तुझं वेळ नसणं
अन् माझं सततचं मागणं..!!
खटकतं मला
तुझं अजाण बनणं
अन् माझं नादान होणं..
तुझं हसून टाळणं
अन् माझं मलाच छळणं..!!
खटकतं मला
तुझं कोरडं राहणं
अन् माझं असवात भिजणं..
तुझं तुझ्या रंगात रंगणं
अन् माझं हतबल पाहणं..!!
कधी खटकेल तुलाही
तुझंच प्रतारणं
अन् माझं नसणं..
तुझं मिश्किल हसणं
अन् माझं लुप्त होणं..!!
--सुनिल पवार..✍️

No comments:

Post a Comment