Thursday, 23 May 2019

गेले ते दिन गेले..

गेले ते दिन गेले..
आठवणींच्या झाडावर
लटकणारे मधू कणांचे पोळे
कोणी निष्ठूरतेने पडून टाकलंय
सैरभैर मधमाशा
मनाला डंख मारत सुटल्या आहेत
आता जगणेच असह्य होतेय
स्पर्शातील ओलावा रुक्ष वाटू लागतोय..!!
जागवू पाहतेय मन
पुन्हा आठवणींचे तेच गोड क्षण
पुन्हा बांधू पाहतेय घर मधू कणांचे
पण सालं झाडच फितूर झालेय
घरटे त्यानेच अव्हेरले
आता हाती इतकेच उरले
गेले ते क्षण गेले
गेले ते दिन गेले..!!
--सुनिल पवार..✍🏼

No comments:

Post a Comment