Thursday, 23 May 2019

एक सावली..

एक सावली..
मंद वारा अन् शांत सागर
त्यावर पसरलेली सोनेरी झालर..
एक नाव लोटलेली खोलवर
अन् किनारा नसलेला दूर दूरवर..!!
अंतरी लपलेली असंख्य वादळे
चिंतीत मन झालेले सैरभैर..
अस्पष्ट होणारी एक सावली
अन् एकटेच उभे मन किनाऱ्यावर..!!
--सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment