प्रिय बाबांस,
तुम्ही निघून गेलात आमच्यातून
पण घडी जीवनाची विस्कटून गेली..
तुमच्यासोबतच गेला ओलावा सारा
अन् नात्यातली तळी आटून गेली..!!
आता ओळखत नाही नातं नात्याला
आता ओळख मात्र पैसा प्रॉपर्टीला..
नाळ तुटून केव्हाच विखुरली गेली
अन् नाती उरलीत केवळ दिखाव्याला..!!
***सुनिल पवार...✍️
💐🙏💐😢
No comments:
Post a Comment