अनोखी रीत...
पाकळ्या गळून गेल्या
याचं शल्य तुला जाचले नाही
पण काटे टोचले म्हणून
तू शब्द केवळ उगाळत राहिली
प्रेमाची ही अनोखी रीत मी तुझ्याजवळ पाहिली..!!
याचं शल्य तुला जाचले नाही
पण काटे टोचले म्हणून
तू शब्द केवळ उगाळत राहिली
प्रेमाची ही अनोखी रीत मी तुझ्याजवळ पाहिली..!!
चूक गुलाबाची किंवा काट्याची नसते
चूक हाताळण्याची असते
अन् तुला हाताळणे जमले नाही
मलमाचा उपचार विसरून
तू केवळ जखम कुरवाळत राहिली
प्रेमाची ही अनोखी रीत मी तुझ्याजवळ पाहिली..!!
चूक हाताळण्याची असते
अन् तुला हाताळणे जमले नाही
मलमाचा उपचार विसरून
तू केवळ जखम कुरवाळत राहिली
प्रेमाची ही अनोखी रीत मी तुझ्याजवळ पाहिली..!!
शब्द शस्त्रच असतात हे मान्य
पण मौनही नसते गं तितके सामान्य
सुख असो, दुःख असो तू कधीच ते वाटले नाही
आच असो वा शीत असो तुझे मन द्रवले नाही
तू एकाच हातानेच टाळी वाजवत राहिली
प्रेमाची ही अनोखी रीत मी तुझ्याजवळ पहिली..!!
पण मौनही नसते गं तितके सामान्य
सुख असो, दुःख असो तू कधीच ते वाटले नाही
आच असो वा शीत असो तुझे मन द्रवले नाही
तू एकाच हातानेच टाळी वाजवत राहिली
प्रेमाची ही अनोखी रीत मी तुझ्याजवळ पहिली..!!
प्रश्न संशयी नसतात, प्रश्नांना काही कारण असते
अपेक्षा असते त्याचं निवारण होण्याची
पण तू मुद्दाम त्यांना टाळत राहिली
संशयाचे रूप देऊन, तू हृदयास केवळ जाळत राहिली
प्रेमाची ही अनोखी रीत मी तुझ्याजवळ पहिली..!!
--सुनिल पवार..✍️
अपेक्षा असते त्याचं निवारण होण्याची
पण तू मुद्दाम त्यांना टाळत राहिली
संशयाचे रूप देऊन, तू हृदयास केवळ जाळत राहिली
प्रेमाची ही अनोखी रीत मी तुझ्याजवळ पहिली..!!
--सुनिल पवार..✍️
No comments:
Post a Comment