Thursday, 23 May 2019

हवेत विरलेला..

हवेत विरलेला..
मी पाहिलंय
आलेला ऋतू माघारी फिरलेला..
अपवाद कोणी नाही
हा संकेत जणू ठरलेला..!!
ओघळणारा थेंबही
पापणीत दिसतो अडलेला..
आभाळाच्या झारीतला
जणू शुक्राचार्य दडलेला..!!
मनात भरून रखरख
कोणी सावली शोधू आलेला..
पण छाटलेला वृक्ष
आपल्याच सावलीस मुकलेला..!!
तरीही त्यावरती
पाखराचा जीव जडलेला..
टाहो त्याने फोडलेला
पण शब्द हवेत विरलेला..!!
मी पाहिलंय
आलेला ऋतू माघारी फिरताना..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment