Monday, 31 August 2015
|| माझ्या कोकणाची भूमी ||
|| माझ्या कोकणाची भूमी ||
===============
माझ्या कोकणाची भूमी
दिसे सुंदर देखणी..
शालू हिरवा लेवुनी
नटे उल्हासे श्रावणी..!!
शुभ्र झऱ्यांचीच गाणी
धाव घेती नदीकडे
जसे भेटण्या साजणी..!!
।। सुर सुन्या मैफिलिचे ।।

|| कांदा ||
********
रडवतोय कांदा,आता खाणे कसले
महागाईंच्या नावाने,मी डोळे पुसले..!!
|| पाळणाघर ||
=========
[बोल बाळबोध]
=========
काल होते हातावर
आज आहे काट्यावर
मम्मी पपा कामावर
झुलवतोय मला पाळणाघर..!!
संक्रात आजी आजोबावर
संस्काराची धुरा सारी
आली आया मावशावर..
मम्मी पप्पा कामावर
झुलवतोय मला पाळणाघर..!!
गोड अक्षरांची आई
आली कधीच मॉमवर
बाबांचाही डॅड झाला
असतात नेहमी टूरवर
मम्मी पप्पा कामावर
झुलवतोय मला पाळणाघर..!!
रांगत होते बाळ गोजिरे
चिऊ काऊच्या घासावर
काळ बदलला आले सारे
शिस्तीच्या धोशावर..
मम्मी पप्पा कामावर
झुलवतोय मला पाळणाघर..!!
वेळ नाही घेण्या कडेवर
कसरत ही नित्य तारेवर
अवलंबून सारेच गरजेवर
कळतय जरी नाही बरोबर..
मम्मी पप्पा कामावर
झुलवतोय मला पाळणाघर..!!
******सुनिल पवार.....
Saturday, 29 August 2015
|| नारळी पोर्णिमेचा सण आला ||
|| नारळी पोर्णिमेचा सण आला ||
===================
नारळी पोर्णिमेचा सण आला
घेवून रक्षा बंधनाला..
औक्षण करुया सागराचे
देईल रत्न तो सुखाचे..
औक्षण करुया भावाचे
देईल वचन तो रक्षणाचे..!!
अर्पुया नारळ सागराला
बांधुया राखी भावाला..
नारळी पोर्णिमेचा सण आला
घेवून रक्षा बंधनाला..!!
नाते अनोख्या प्रेमाचे
नाते हे बहिण भावाचे..
नाते अनोखे कृतज्ञतेचे
नाते हे कोळी सागराचे..!!
अर्थ देवुया धाग्याला
जागुया दिल्या वचनाला..
नारळी पोर्णिमेचा सण आला
घेवून रक्षा बंधनाला..!!
******सुनिल पवार....
Wednesday, 19 August 2015
II धुमशान II
========
कोण वाहतोय भूषण
कोण देतोय दूषण..
घरात नाही रेशन
ठोकत सुटतोय भाषण..!!
कोणाच उदघोषण
तर कोणाच प्रोमोशन..
कोणाच्या जिवावर
कोण होतंय रोशन..!!
उपासमार, कुपोषण
कुठे अबलांचे शोषण..
चाड आहे कोणास
कुठे आहे शासन...!!
सारेच कसे पाषाण
व्यवस्था भासे स्मशान
सामान्य सरणावर
अन नेत्यांच धुमशान..!!
**********सुनील पवार....
II नागपंचमी II
=====================
निसर्गाच्या बांधीलकीतून
निर्मित झाला नागपंचमी सण।
त्या निमित्ताने का होईना
माणूस उतरवू पाहतोय नागाचे ऋण।
शेतकऱ्यांचा सच्चा मित्र
तो उंदीर खाऊन पीक वाचवतो।
पण माणूस मात्र जागोजागी
त्यांचा संहार करताना दिसतो।
भीतीपोटी दंश करतो कधीतरी
तो सहसा कुणाच्या वाटेस जात नाही।
अन् तुमच्या समजुतीप्रमाणे
तो दूध अन् लाह्या सुद्धा खात नाही।
निसर्ग साखळीचा अविभाज्य भाग
म्हणून त्याच्या अस्तित्वाला जपायला हवे।
केवळ आंधळी पूजा उपयोगी नाही
तर सणाचे मर्म समजून घ्यायला हवे।
जिवंत नागाचा अट्टाहास मुळीच नको
त्याचे प्रतिकात्मक पूजन जरूर करा।
विज्ञानाच्या चष्म्यातून पहा अन्
समृद्ध सणाचा आनंद द्विगुणित करा।
--सुनिल पवार..✍️
Tuesday, 18 August 2015
||| ध्यास घरट्याचा ||
तरी लागे नेत्री झळा..
एक ध्यास घरट्याचा
झाला पाला रे पाचोळा..!!
होता झूलत नभात
उंच स्वप्नांचा झोपाळा..
आला कुठूनसा वारा
मना उडवून गेला..!!
भेटण्यास सागराला
आले उधाण मनाला..
मार्ग खाच खळग्यांचा
नाही तमा सरितेला..!!
ओढ होती का रामाला
धाडे वनात सीतेला..
जग अग्निकुंड सारे
अंत नसे त्या शिक्षेला..!!
काय म्हणू नियतीला
कसा घातला रे घाला..
स्वप्न ईमला गोजीरा
तिने मातीमोल केला..!!
क्रमशः
Monday, 17 August 2015
|| मयुरा ||
======
होता आगमन श्रावणाचे
इंद्रधनुसे फुले मनात..
ऊन पाऊस खेळ चाले
आठवणीच्या वनात..!!
हळव्या प्रीतीची हिरवळ..
मोहक तव चालणे जैसे
हिरव्या पानांची सळसळ..!!
धुंद वाऱ्याच्या लहरीवर
होई बावरे मन चंचल..
फुला फुलावर मुक्त डोले
तुझेच सुंदर मुखकमल..!!
सरीवर सर धावून येते
उडवीत रिमझिम फवारा..
लोभस तव हास्य जैसे
खळखळ ओढ्याचा नजारा..!!
गंधाळत अन मनास भारत
शीळ घालीत येतो वारा..
नाचे थुई थुई श्रावणात
आठवणींचा मोहक मयूरा..!!
******सुनिल पवार...

|| श्रेष्टतेचा हव्यास ||
=============
समजलो पुण्यवान स्वतःस
जन्मताच सुयेर झाला..
मरणानेही ना सुटला
सुतकाने बाध्य झाला..!!
|| नारीच्या नशीबी ||
=============
न मागताच मिळाले सारे
मुखवट्यातले बेगड़ी चहरे..
छद्मी हास्य अन लोचट शेरे
नारीच्या नाशिबी हे,
भोग असे का रे..!!
तयांस कधी तू छेडले का रे..
मीही कुणाची भगिनी ना रे
तुला ती वेगळी दिसते का रे..??
राम बनून जो घरात वावरे
बाहेर रावण बनतो का रे..
माय भगिनीचे प्रेम सारे
पड़ता बाहेर विसरतो का रे..!!
चंचल मनाचे तुझ्या चंचल वारे
अंतरात्म्यास टटोल जरा रे..
संकुचित मनाची उघडा दारे
नजरेत तुमच्या सन्मान भरा रे..!!
*********सुनिल पवार......
Friday, 14 August 2015
।। स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
।। स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
========================
========================
धमण्यांतुन वाहे
जाज्वल देशाचा अभिमान
नजरेत भरून राहे
माझ्या तिरंग्याची शान..!!
जन्मभूमी तू कर्मभूमी
तूच माझा जीव प्राण
हृदयात चिरंतर आहे
माझा भारत देश महान..!!
================
================
******सुनिल पवार....
|| पाहायचा आहे मज ||

Tuesday, 11 August 2015
II शिकतोय कविता II
=============
कोणी शब्द मला गुंफुन दाखवा
हो शिकतोय कविता शिकवून दाखवा..!!
मला बी तुम्ही शिकवा ना रे
कसा सजवायचा फुलांचा ताटवा
हो शिकतोय कविता शिकवून दाखवा..!!
यमकाचे गणित समजेना काही
मात्रा अलंकाराच् नाव नको बाई
कोणी चारोळीला कडव्यात बसवा
हो शिकतोय कविता शिकवून दाखवा..!!
विषयाचा विषय समजवा कोणी
शंका एक आलीय माझ्या मनी
कोणी विषयात विषय ज़रा घुसवा
हो शिकतोय कविता शिकवून दाखवा..!!
भावनेस जागा असते का काही
उधळावी कशी अलंकारी लाही
पडलाय अंधार दिवा ज़रा पेटवा
हो शिकतोय कविता शिकवून दाखवा..!!
कोणी शब्द मला गुंफुन दाखवा
हो शिकतोय कविता शिकवून दाखवा..!!
*******सुनिल पवार......
|| झेंडा ऊंचा रहे हमारा ||
===============
स्वातंत्र दिन जवळ आला
आता देश प्रेमाचा वाहील वारा..
वर्षभराचा सुस्त पसारा
जागृत अकस्मात् होईल सारा..!!
II जलद आले II
Thursday, 6 August 2015
II मन मनाच्या II
*****************
मन मनाच्या सागराला
मनाचा किनारा..
मन मनाच्या किनाऱ्याला
क्षितीज पसारा..!!
मनाचा नजारा..
मन मनाच्या नजाऱ्याला
मनोरंगाचा सहारा..!!
मन मनाच्या रंगात त्या
मनाचा मयूरा..
मन मनाच्या मयूराला
मानाचा पिसारा..!!
मन मनाच्या पिसाऱ्याला
नजरेचा भुलोरा..
नजरेच्या भुलोऱ्याला
मन वाऱ्याचा फुलोरा..!!
मन वाऱ्याच्या फुलोऱ्याने
उठे मनात शहारा
मन मनाच्या शहाऱ्याला
असे आठवांचा उबारा..!!
******सुनिल पवार....
Monday, 3 August 2015
||| बेजबाबदार |||
==========
बेजबाबदारपणाचा कळस
आजची प्रसार माध्यमं
महत्व कोणास द्यावे
ना राहिले तारतम्य..!!
एक छोटसं विधान..
देशद्रोह्यांसाठी मात्र
दिवसभराच घुमान..!!
एकीकडे राजकीय चिखल
दूसरी मिडियाची दलदल..
कोणास ना कसली चाड
उद्धिष्ट मात्र ह्यांच सफल..!!
प्रश्न कोणास करावे..??
कोणास किती महत्व द्यावे..??
आग लावून समाजात
ह्यांनी नामानिराळे राहावे..!!
टी आर पी च्या स्वार्थात्
ब्रीद पत्रकारीतेचं विसरले..
सार्वभौमत्वास काळीमें फासले
वर आम्हीच पाहिले..
शेखी मिरवते झाले..!!
*******सुनिल पवार...
।। मैत्री आमची लईभारी ।।
लोक म्हणतात फेसबुक म्हणजे एक आभासी जग..पण हे जग आम्ही मैत्रीच्या रुपात वास्तवात उतरवलं..तितक्याच प्रेमाने जोपासलं..तेच भाव माझ्या काव्यात उतरले...मैत्रीदिनी शब्द फूल वाहीले..
================
।। मैत्री आमची लईभारी ।।
=================
आभासी जग हे जरी
मैत्री तरी ही लईभारी..
नकळत जुळले ऋणानुबंध
दृढ़ झाली त्यातून यारी..!!
रहा मित्रा जरा सतर्क..
नको खेळ विस्तवाचा
आणि असेच तर्क वितर्क..!!
खोडून काढले तयांचे
सारेच तर्क वितर्क..
कोळून प्यालो मी
त्याचेच करून अर्क..!!
आभासी जग मग सारे
उतरले असे प्रत्यक्षात..
घडली भेट अन समजले
हिरेच गवसले साक्षात..!!
नकळत बसले मनमंदिरी
जाणे येणे झाले घरी..
निर्मोही स्नेह जुळले
मैत्री अशी ही लईभारी..!!
जपले मनात सर्वानीच
मैत्रीचे हे सोनेरी पर्व..
आमच्या ह्या मैत्रीचा
मला असेल नित्य गर्व..!!
*****सुनिल पवार......
|| निसर्ग ज्ञानझरा ||
निसर्ग ज्ञानझरा..
जेथे जातो तेथे गुरु मज दिसतो।
निसर्ग बनते शाळा मी विद्यार्थी होतो।
गाय हंबरे वात्सल्ये वासरु घेतसे धाव।
ममतेच्या सूत्राचा तेथे लागे ठाव।
किलबिलती पाखरे शीळ घाली वारा।
संगीताचे ज्ञान देई शुभ्र वाहता झरा।
घट्ट बिलगून वेली आधारास राहती।
दृढ विश्वासाची शिकवण तरुवर देती।
फुलपाखरे बागडती फुलांफुलांवरून।
आनंदाचा उगम स्तोत्र गंधळतो त्यातुन।
नदी दौडते आवेगे विलीन होते सागरी।
प्रेम समर्पणाचा भाव मिळे तेथे सत्वरी।
न आटणार कधीही ज्ञानझरा।
होई जीवन समृद्ध कास त्याची धरा।
--सुनील पवार..✍🏼
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Saturday, 1 August 2015
|| मैत्री तुझी अन माझी ||
|| मैत्री तुझी अन माझी ||
===============
मैत्री कृष्ण सुदाम्याची
मैत्री आत्म्या परमात्म्याची..
ना रंक ना रावाची
मैत्री पवित्र नात्याची..!!
मैत्री दुयोधन अन कर्णाची
मैत्री स्वार्थ निःस्वार्थाची
मैत्री अपेक्षा अन उपेक्षाची
तरीही वेगळ्या अर्थाची..!!
मैत्री तुझी अन माझी
मैत्री शब्द अन काव्याची
अनोळखी परी ओळखीची
सावली जशी विसाव्याची..!!
*****सुनिल पवार......
|| मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||