||पाहायचा आहे मज||
पाहायचा आहे मज भारत
माणसात माणुसकी असलेला..
जातीधर्माच्या बंधनातून सुटलेला
एका प्रवाहात मिसळलेला..!!
पाहायचा आहे मज भारत
गरीब श्रीमंतीची दरी नसलेला..
सर्वसमान हक्क असलेला
साखरेसम पाण्यात विरघळलेला..!!
पाहायचा आहे मज भारत
शिक्षणाचा बाजार नसलेला..
गुरु शिष्य नाते जपलेला..
आदर्श गुरुकुल साकारलेला..!!
पहायचा आहे मज भारत
लोकप्रतिनिधी सच्चा असलेला..
सामाजिक भान जपलेला..
खऱ्या अर्थाने लोकशाही रुजलेला..!!
पहायचा आहे मज भारत
स्वच्छ आणि सुंदर नटलेला..
शिस्तप्रिय सुदृढ असलेला
सुवर्णयुग पुन्हा अवतरलेला..!!
पहायचा आहे मज भारत
जो नव्याने स्वतंत्र झालेला..
स्वावलंबी संपन्न झालेला
सार्वभौम शक्तिशाली बनलेला
""""""""""""आणि""""""""""
अभिमानाने जगात मिरवलेला..!!
--सुनिल पवार..

No comments:
Post a Comment