Monday, 17 August 2015

|| शब्द शब्द ||

|| शब्द शब्द ||
==========
शब्दांच्या चढाओढीत
हार जीत शब्दाची होते..
क्षणिक शाब्दिक वादात
मन कायम दुखावले जाते..!!


वाटते कधी मनास
शब्द माझेच खरे होते..
तरीही मग का उगाच
मन हळवे हुरहुरते नुसते..!!

शब्द शब्द कधी एकाकी
अविचित मनात रुततात..
शब्द शब्द परी अंती
मन मनास पूज्य असतात..!!
****सुनिल पवार...

No comments:

Post a Comment