जलद आले..
जलद आले जलद आले..
काय असे भरुनी आले..!!
वारे शीतल वाहू लागले..
का डोळ्यातून पाणी आले..!!
सृष्टि नवा साज ल्याली..
का तू अशी हिरमुसलेली..!!
पाने फुले हर्षे भिजलेली..
का तू दिसते थिजलेली...!!
खळखळ वाहे ओहळ पाणी..
का गंं मलूल तुझी साजणी..!!
वारा गातो पाऊस गाणी..
का मूक झाली तुझी वाणी..!!
पालवी कोवळी फुटू लागली..
का तू रुक्ष कोमजलेली..!!
विसर सखे कटु आठवणी..
छेड़ प्रिये तू प्रीत दिवानी..!!
--सुनील पवार..

No comments:
Post a Comment