Tuesday, 11 August 2015

|| झेंडा ऊंचा रहे हमारा ||

|| झेंडा ऊंचा रहे हमारा ||
===============
स्वातंत्र दिन जवळ आला
आता देश प्रेमाचा वाहील वारा..
वर्षभराचा सुस्त पसारा
जागृत अकस्मात् होईल सारा..!!


झेंडा ऊंचा रहे हमारा
आसमंती घुमेल नारा..
तासाभराचा समारोह सारा
जाईल मग जो तो घरा..!!

असाच होतो हो आमचा
नित्य स्वतंत्र दिन साजरा..
घरात बसून आम्ही म्हणतो
झेंडा ऊंचा रहे हमारा..!!
****सुनिल पवार...

No comments:

Post a Comment