Monday, 17 August 2015

|| मयुरा ||

|| मयुरा ||
======
होता आगमन श्रावणाचे
इंद्रधनुसे फुले मनात..
ऊन पाऊस खेळ चाले
आठवणीच्या वनात..!!

ओढ़ लावीते जीवास
हळव्या प्रीतीची हिरवळ..
मोहक तव चालणे जैसे
हिरव्या पानांची सळसळ..!!
धुंद वाऱ्याच्या लहरीवर
होई बावरे मन चंचल..
फुला फुलावर मुक्त डोले
तुझेच सुंदर मुखकमल..!!
सरीवर सर धावून येते
उडवीत रिमझिम फवारा..
लोभस तव हास्य जैसे
खळखळ ओढ्याचा नजारा..!!
गंधाळत अन मनास भारत
शीळ घालीत येतो वारा..
नाचे थुई थुई श्रावणात
आठवणींचा मोहक मयूरा..!!
******सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment