|| भातुकली ||
|| भातुकली ||
=========
खेळ तो भातुकलीचा
राजस राजा राणीचा..
खेळ तोच स्वप्नातला
तुझ्या माझ्या मनातला..!!
तुलाही आवडलेला
मलाही आवडलेला..
डाव एक मांडलेला
भावनांनी सांधलेला..!!
दृष्ट जशी लागलेला
ना कोणा समजलेला..
मी मनात जपलेला
अर्ध्यातच मोडलेला..!!
****सुनिल पवार.....
No comments:
Post a Comment