Wednesday, 19 August 2015

II नागपंचमी II

|| नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ||
=====================
निसर्गाच्या बांधीलकीतून
निर्मित झाला नागपंचमी सण।
त्या निमित्ताने का होईना
माणूस उतरवू पाहतोय नागाचे ऋण।

शेतकऱ्यांचा सच्चा मित्र
तो उंदीर खाऊन पीक वाचवतो।
पण माणूस मात्र जागोजागी
त्यांचा संहार करताना दिसतो।

भीतीपोटी दंश करतो कधीतरी
तो सहसा कुणाच्या वाटेस जात नाही।
अन् तुमच्या समजुतीप्रमाणे
तो दूध अन् लाह्या सुद्धा खात नाही।

निसर्ग साखळीचा अविभाज्य भाग
म्हणून त्याच्या अस्तित्वाला जपायला हवे।
केवळ आंधळी पूजा उपयोगी नाही
तर सणाचे मर्म समजून घ्यायला हवे।

जिवंत नागाचा अट्टाहास मुळीच नको
त्याचे प्रतिकात्मक पूजन जरूर  करा।
विज्ञानाच्या चष्म्यातून पहा अन्
समृद्ध सणाचा आनंद द्विगुणित करा।
--सुनिल पवार..✍️

No comments:

Post a Comment