निसर्ग ज्ञानझरा..
जेथे जातो तेथे गुरु मज दिसतो।
निसर्ग बनते शाळा मी विद्यार्थी होतो।
गाय हंबरे वात्सल्ये वासरु घेतसे धाव।
ममतेच्या सूत्राचा तेथे लागे ठाव।
किलबिलती पाखरे शीळ घाली वारा।
संगीताचे ज्ञान देई शुभ्र वाहता झरा।
घट्ट बिलगून वेली आधारास राहती।
दृढ विश्वासाची शिकवण तरुवर देती।
फुलपाखरे बागडती फुलांफुलांवरून।
आनंदाचा उगम स्तोत्र गंधळतो त्यातुन।
नदी दौडते आवेगे विलीन होते सागरी।
प्रेम समर्पणाचा भाव मिळे तेथे सत्वरी।
न आटणार कधीही ज्ञानझरा।
होई जीवन समृद्ध कास त्याची धरा।
--सुनील पवार..✍🏼
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
No comments:
Post a Comment