Monday, 3 August 2015

।। मैत्री आमची लईभारी ।।

नमस्कार मित्रहो,
लोक म्हणतात फेसबुक म्हणजे एक आभासी जग..पण हे जग आम्ही मैत्रीच्या रुपात वास्तवात उतरवलं..तितक्याच प्रेमाने जोपासलं..तेच भाव माझ्या काव्यात उतरले...मैत्रीदिनी शब्द फूल वाहीले..
================
।। मैत्री आमची लईभारी ।।
=================
आभासी जग हे जरी
मैत्री तरी ही लईभारी..
नकळत जुळले ऋणानुबंध
दृढ़ झाली त्यातून यारी..!!


होते अनाहूत मिळाले सल्ले
रहा मित्रा जरा सतर्क..
नको खेळ विस्तवाचा
आणि असेच तर्क वितर्क..!!

खोडून काढले तयांचे
सारेच तर्क वितर्क..
कोळून प्यालो मी
त्याचेच करून अर्क..!!

आभासी जग मग सारे
उतरले असे प्रत्यक्षात..
घडली भेट अन समजले
हिरेच गवसले साक्षात..!!

नकळत बसले मनमंदिरी
जाणे येणे झाले घरी..
निर्मोही स्नेह जुळले
मैत्री अशी ही लईभारी..!!

जपले मनात सर्वानीच
मैत्रीचे हे सोनेरी पर्व..
आमच्या ह्या मैत्रीचा
मला असेल नित्य गर्व..!!
*****सुनिल पवार......

No comments:

Post a Comment