Showing posts with label हायकू काव्य. Show all posts
Showing posts with label हायकू काव्य. Show all posts

Friday, 24 July 2020

हायकू रानातले

1)
खग उडाले
आकाशात पांगले
पोट भुकेले..!!
2)
समुद्र पक्षी
जलावर खेळतो
मच्छ हेरतो..!!
3)
हिरव्या रानी
वेगवेगळे पक्षी
रंगीत नक्षी..!!
4)
हिरवा राऊ
झाडावर बसला
पान झालेला..!!
5)
रात्रीच्या वेळी
पालिते पेटलेले
शोधक डोळे..!!
6)
छोट्या पंखांची
फडफड जोरात
मध मनात..!!
7)
पक्षांचा रव
रानोमाळी घुमला
साद प्रेमाला..!!
--सुनील पवार..✍️
भारत जगताप, Ratna Kamble and 22 others
5 Comments
Like
Comment
Share

Thursday, 23 May 2019

हायकू उन्हाच्या...

हायकू उन्हाच्या...
गुलमोहर
उन्हात फुललेला
सावली झाला..!!
तापली धरा
सुरकुत्या अंगाला
दिसते जरा..!!
खोल विहीर
पाण्याविना आटली
नेत्री दाटली..!!
आंबा केशरी
वृक्षी लगडलेला
सावज झाला..!!
फळ पिकलं
झाडास ओझं झालं
झडून गेलं..!!
--सुनिल पवार...✍️

Sunday, 29 July 2018

*हायकू पावसाच्या*

*हायकू पावसाच्या*
==============
दाटून आले
मेघ आसमंतात
भीती मनात..!!
पाऊस आला
झरझर झरला
आसवे झाला..!!
पाऊस धारा
अवनीस भेटल्या
गहिवरल्या..!!
तळे साचले
रस्त्यात उतरले
चिखल झाले..!!
कातर वेळ
अंधारलं आकाश
भास डोळ्यास..!!
**सुनिल पवार...✍🏼

Thursday, 28 June 2018

|| हायकू पावसाच्या ||

|| चातक पक्षी ||
==========
चातक पक्षी
वणवण करतो 
थेंब दाटतो..!!
पाऊस असा 
रिमझिम पडतो
जीव जडतो..!!
थेंब ईवले
तृणास बिलगले..
मोत्यांचे झाले..!!
भेगा भुईच्या
हळुवार सांधल्या
गंधित झाल्या..!!
तृण कोवळे
भूवरी अंकुरले
पालवी झाले..!!
--सुनिल पवार..✍🏼

Friday, 8 June 2018

हायकू पहाट

हायकू* पहाट

१)
दारात आली
वसुदेवाची स्वारी..
सकाळ झाली..!!

२)
उन्ह कोवळे
धरेस बिलगले
गाव जागले..!!

३)
खग उडाले
दसदिशा पांगले
पोट भुकेले..!!

४)
हंबरे गाय
वासरास पुकारे
व्याकुळ माय..!!

५)
भविष्यासाठी
पायपीट चालली
बिऱ्हाड पाठी..!!
**सुनिल पवार..✍🏼

Tuesday, 1 May 2018

ll हायकू* उन्हाच्या ll

हायकू* उन्हाच्या
==========
*१*
आग ओकतो
सूर्य धरणीवर
बळी राबतो..!!
*२*
पक्षांचा वास
निष्पर्ण झाडावर
पानांचा भास..!!
*३*
पाणी आटले
विहिरी तळ्यातले
डोळा दाटले..!!
*४*
भेगा भुईच्या
वाचून पहा कोणी
रेषा भाळीच्या..!!
*५*
रस्ता अतृप्त
पायपीट अखंड
जीवन लुप्त..!!
**सुनिल पवार..✍🏼

Wednesday, 18 April 2018

निसर्ग हायकू..

निसर्ग हायकू..

 *१*
सूर्य धरतो
माथ्यावर छत्र
दाहक मात्र..!!

*२*
झाडांनी दिली
मानवास सावली
कत्तल झाली..!!

*३*
फुल फुलले
सुगंधात नाहले
निर्माल्य झाले..!!

*४*
फळ गोमटे
तरुस लगडले
नशिबी गोटे..!!

*५*
मर्कट उड्या
रानात दिसतात
मानवी खोड्या..!!
**सुनिल पवार..✍🏼





Sunday, 31 December 2017

|| शिशिर आला ||

शिशिर आला.. (हायकू)
शिशिर आला
वारा शीतल झाला
कंप देहाला..!!१!!
पान गळले
भूमीवर पडले
विदीर्ण झाले..!!२!!
तरु भकास
पाखरांचा निवास
पानांचा भास..!!३!!
आंबेमोहोर
दिसे देखणा फार
पाडास भार..!!४!!
सुमनांवर
दवबिंदूंचा थर
ओला पदर..!!५!!
पालापाचोळा
वाटेवर कण्हला
जपून चाला..!!६!!
--सुनील पवार..

Sunday, 10 December 2017

|| ही सांजवेळ ||


|| ही सांजवेळ ||
===========
ही सांजवेळ
ना इथे नाही तिथे
कातरवेळ..!!

ही सांजवेळ
रंगीत क्षितिजाचे
स्वप्नील खेळ..!!
ही सांजवेळ
दिवसाचा रात्रीशी
धूसर मेळ..!!
ही सांजवेळ
तप्त दिनकराची
समाधी वेळ..!!
***$p..✍🏼
🌼सुसंध्या🌼

Wednesday, 8 November 2017

|| सांज किनारा ||

|| सांज किनारा ||
===========
केशर रंगी
रंगले रत्नाकर
किनाऱ्यावर..!!१!!

पक्षांचा थवा
लाटेवर खेळतो
मच्छ हेरतो..!!२!!
स्वप्न सुबक
वाळूत रेखाटली
लाटेने नेली..!!३!!
कातरवेळी
रंग भरून नभी
मिटली छबी..!!४!!
पाऊलखुणा
उरल्यात माघारी
हृदयावरी..!!५!!
***सुनिल पवार...✍🏼

Sunday, 10 September 2017

|| आभाळ माया ||

|| आभाळ माया ||
===========
आभाळ माया
फोडतसे पाझर
झरे डोंगर..!! १!!

थेंबा थेंबात
मोतीयांची आरास
क्षणाचा भास..!!२!!

फुलांचे रंग
पठारास लाभले
दुःख झाकले..!!३!!

हिरव्या रानी
उंडरतात गवे
मानवी थवे..!!४!!

कळ्या फुलल्या
इंद्रधनुष्य झाल्या
देवा वाहिल्या..!!५!!

तपस्वी बक
गवतावर दक्ष
भक्षिण्या भक्ष..!!६!!

गुरांशी दोस्ती
कावळ्याने ही केली.?
भूक मिटली..!!७!!
***सुनिल पवार..✍🏼

Saturday, 26 August 2017

|| असे हे थेंब ||

*हायकू*
*=====*
|| असे हे थेंब ||
==========
असे हे थेंब
झर झर झरले..
दुःख हरले..!!१!!

दुःख हरले
जल हे ओसरले
जलद झाले..!!२!!
जलद झाले
पुनश्च पाझरले
थेंब झेलले..!!३!!
थेंब झेलले
मन दरवळले
सुमन झाले..!!४!!
सुमन झाले
वाऱ्याने झुलवले
मोद भरले..!!५!!
*सुनिल पवार*..✍🏼😊

Monday, 21 August 2017

हायकू पावसाचे

हायकू पावसाचे.. 

मेघांची दाटी
आसमंतात झाली
चिंता ललाटी..!!

अल्लड वारा
बेधुंद निलाजरा
उडे निवारा..!!
मोहक दिसे
सौदामिनीचा लोळ
झाले कोळसे..!!
पाऊस वेडा
भिजवून चालला
नयन कडा..!!
साचले पाणी
जलाशय भोवती
कोरडी वाणी..!!
***सुनिल पवार..✍🏼

Monday, 7 August 2017

थेंब पाण्याचा

थेंब पाण्याचा
========
थेंब पाण्याचा
पानावर सजला
डोळ्यात आला..!!१!!


फुल फुलले
वाऱ्यावर झुलले
कोणी खुडले..!!२!!

देठ हिरवा
सळसळ पानाला
सोय चाऱ्याला..!!३!!

मोहक रंग
फुलपाखरू ल्याले
जगास भ्याले..!!४!!

भ्रमर काळा
घालतो गोड पिंगा
मनात दंगा..!!५!!
***सुनिल पवार...✍🏼

Saturday, 13 May 2017

|| हायकू सकाळ ||

|| हायकू सकाळ ||
============
पळस लाल
पेटलेला अंगार
छाया आधार..!!

वाटेत उभा
फुलवीत रंगारा..
दग्ध पांगेरा..!!
गुलमोहर तो
प्रतिसुर्य भासतो
सावली देतो..!!
उन्ह कोवळी
तया सोनझळाळी
अंगास जाळी..!!
मंद वारा
मिश्किल निलाजरा
अंगात धारा..!!
***सुनिल पवार...✍🏽😊

Sunday, 19 March 2017

|| हायकू पहाट ||

|| हायकू पहाट ||
===========
स्वप्न धवल
आसमंतात लाल..
झाली सकाळ..!!
निळ्या आकाशी
पाखरे झेपावली..
पिल्लं भुकेली..!!
फुला फुलास
फुलपाखरू भेटले..
रंग लुटले..!!
वारा भुलला
उमलत्या फुलाला..
गंधित झाला..!!
रम्य नजारा
भुलवी नजरेला..
वेळ कोणाला..?
**सुनिल पवार...✍🏽

Monday, 7 November 2016

|| निसर्ग खेळ ||

हायकू....
|| निसर्ग खेळ ||
===========
देखणा साज
वाटेत हरवला..
झरा आटला..!!१!!
कोरड्या वाटा
लुप्त पाऊलखुणा
ओलाव्याविना..!!२!!
शिशीर घाला
बहर ओसरला..
पाचोळा झाला..!!३!!
सुटला पीळ
विलग झाली वेल..
निसर्ग खेळ..!!४!!
झडली पानं
मुकले सावलीला..
सल झाडाला..!!५!!
***$p...✍🏽

Tuesday, 12 April 2016

|| भास्कर आला ||

|| सुप्रभात||
=◆=◆=◆=
भास्कर आला
दिली लाली नभाला
जाग माणसा..!!
उड़े पाखरू
पाहे नभास धरु
भूक पोटाला..!!
वारा वाहतो
पानोपानी बोलतो
गाथा उष्म्याची..!!
कळी फुलली
फुलांचा साज ल्याली
देवा वाहिली..!!
🙏🌹🙏🌹🙏
***सुनिल पवार...

Monday, 4 April 2016

|| सागर वाणी ||



|| भग्न किनारा ||

१)
सागर पाणी
खारटपण उरी 
लाट किनारी..!!

२)
क्षितिजावरी 
रंगलेले नज़ारे
भासच सारे..!!

३)
शिंपल्यातुन 
दिसून येती मोती
विलग होती..!!

४)
उन्मादी वारा
करी लाटांचा मारा 
भग्न किनारा..!!
--सुनिल पवार..

Thursday, 6 August 2015

II हायकू II

II हायकू II
=======
शिकतोय मी
हायकुचा प्रकार
घेतो आकार..!!

शिकुया सारे
ते काव्याचे प्रकार
ते अलंकार..!!

शब्द साकार
लहान अविष्कार
काव्य प्रकार..!!

काव्य ते जाण
दिसे जरी लहान
अर्थ महान..!!
****सुनिल पवार....