कडवट परंतु सत्य 😌
***************
|| विकृत दीवाने ||
============
काल ती म्हणाली,
हे सौंदर्य ठरतयं जीवघेणे
नकळे शाप का वरदान
नको वाटते ते सजणे..!!
मी म्हटलं काय झाले
हे सौंदर्य तर तुझे लेणे..
घे उपभोग दिलखुलास
आम्ही ही त्याचेच दिवाने..!!
उत्तरली ती कसा घेऊ..??
असहय्य होतेय तुमचे वागणे..
मैत्रीच्या आडून
पावला पावलावर लाळ घोळणे..!!
प्रत्येक जागी तेच दुखणे
ऑफिसमधे बॉसचे स्पर्शणे
ह्या त्या कारणाने
केबिन मधे बोलावणे..!!
बस, बाजार, हमरत्यावर
कुठे आहे सुरक्षित जाणे..
पाणचट विनोद, लोचट शेरे
सलते मनास नजरेचे पिणे..!!
सोशल मैत्री तशीच बेगड़ी
न दिसणारी वाट वाकड़ी..
विश्वासाच्या पाठीत खंजीर ख़ुपसणे
कठिन आहे इथे पुरुषास समजणे..!!
कधी कधी नाही, नेहमीच वाटते
नको हे असले स्त्री चे जीणे..
आलेच वाट्यास तर कुरूप असावे
नसावे कोणास त्याचे घेणे देणे..!!
ऐकली तिची करुण कहाणी
न जमले परंतु उत्तर देणे..
देऊन तरी काय देणार..?
आम्ही सौंदर्याचे विकृत दिवाने..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*****सुनिल पवार....
हे सौंदर्य तर तुझे लेणे..
घे उपभोग दिलखुलास
आम्ही ही त्याचेच दिवाने..!!
उत्तरली ती कसा घेऊ..??
असहय्य होतेय तुमचे वागणे..
मैत्रीच्या आडून
पावला पावलावर लाळ घोळणे..!!
प्रत्येक जागी तेच दुखणे
ऑफिसमधे बॉसचे स्पर्शणे
ह्या त्या कारणाने
केबिन मधे बोलावणे..!!
बस, बाजार, हमरत्यावर
कुठे आहे सुरक्षित जाणे..
पाणचट विनोद, लोचट शेरे
सलते मनास नजरेचे पिणे..!!
सोशल मैत्री तशीच बेगड़ी
न दिसणारी वाट वाकड़ी..
विश्वासाच्या पाठीत खंजीर ख़ुपसणे
कठिन आहे इथे पुरुषास समजणे..!!
कधी कधी नाही, नेहमीच वाटते
नको हे असले स्त्री चे जीणे..
आलेच वाट्यास तर कुरूप असावे
नसावे कोणास त्याचे घेणे देणे..!!
ऐकली तिची करुण कहाणी
न जमले परंतु उत्तर देणे..
देऊन तरी काय देणार..?
आम्ही सौंदर्याचे विकृत दिवाने..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*****सुनिल पवार....
No comments:
Post a Comment