Thursday, 2 June 2016

|| चित्र ||


|| चित्र ||
=◆=◆=
हे चित्र रेखिले कुणी असे
अलगद जाऊनी मनी वसे..
किती लपवु भाव ते अंतरी
नयन पटलातुनी चित्र दिसे..!!

वाजती रुणझुण पैजण ते
संगीत मधुर झंकारतसे..
मन शोधते त्या पाऊलखुणा
वाटेवर नजर खिळून बसे..!!
हा गंध धुंदसा परिमळ
लावितो जीवास कसले पिसे..
मी सैरभैर असा वाऱ्यावर
कस्तुरी मृगापरी शोधतसे..!!
आभास म्हणू का सत्य असे
कलेकलेचा नभी खेळ दिसे..
सजली ही रात अशी चंदेरी
ध्यानी मनी ती स्वप्नी वसे..!!
*****सुनिल पवार.......

No comments:

Post a Comment