Thursday, 2 June 2016

|| हरवलेला वाढदिवस ||

|| हरवलेला वाढदिवस ||
=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=
आठवत नाहीत
आमच्या लहानपणी
कधी वाढदिवस साजरे झाले..
ना औक्षण आईने केले
ना वडिलांनी कधी सांगितले
कैक वाढदिवस आले अन
न सांगताच निघुन गेले..!!

कॉलेजच्या उंबरठ्यावर
पाऊल ठेवले
अन निघुन गेलेले वाढदिवस
नव्याने भेटु लागले..
मित्रांच्या संगतीने
कुठे कट्टयावर तर
कधी कॅंटीन मधे
कटिंग पिण्यात रंगु लागले..!!
पुढे कॉलेज सुटले
वाढदिवसाचे नाते पुन्हा तुटले
मधेच कोणा मित्राने
कधी संदेश पत्र धाडले..
स्वरुप इतकेच होते
काही क्षण हळवे होते
मोजक्या काही क्षणावर
जीव विशेष होते जडले..!!
हरवलेले ते वाढदिवस
आता मुलांत रमुन
साजरे करतो..
माझ्या रीत्या रांजणास
नव हर्षाने,
नव्या उत्साहाने
मी ओसंडून भरतो..!!
बालपणी गुपुचुप निघुन जाणारा
तो वाढदिवस
आता दवंडी पीटत येतो..
मी तोच बालक होतो
अन तुम्हा स्नेही मित्रात
मज नव्याने पालक भेटतो..!!
*****सुनिल पवार....
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
🙏धन्यवाद स्नेही कवी मित्रानो 🙏
🙏तुमच्या अमूल्य शुभेच्छा रूपी प्रेमास मी निरंतर ठेवींन स्मरणात🙏

No comments:

Post a Comment