Thursday, 2 June 2016

|| *तो* ||

|| *तो* ||
◆◆◆◆
काल तो आला होता
अंधार ओढ़त..
प्रेम वर्षाव करायला..
आतुरल्या अचैत जीवात
नवा प्राण भरायला..!!

आतुर भासला तो जणू
ती हि तितकीच आतुर भेटायला..
स्पर्शिताच प्रेमे
लागले अंग अंग पेटायला..!!

आलिंगले अवचित त्याने तिला
तिचे तन मन लागले शहारायला..
मिसळला गंध श्वासात,आसमंतात
अन दिशा लागल्या मोहरायला..!!

पण
औट घटकेचाच ठरला शृगार
तो आला तसाच निघूनही गेला
मतलबी प्रेम लागले अधिक छळायला..
सौदामिचा कडकडाट
बरंच काही सांगून गेला
ती हतबल उभी तशीच
अन झोपडीची ती वाताहात
उरली मागे साक्षीला..!!
***सुनिल पवार...💦

No comments:

Post a Comment