|| आंबे ||
========
डवरलेल्या त्या
आंब्यावर
किती मोहक
हिरवे पिवळे केसरी
आंबे लगडलेले होते..
काही उघड
काही पाना आड़
बेमालूम असे
दडलेले होते..!!
========
डवरलेल्या त्या
आंब्यावर
किती मोहक
हिरवे पिवळे केसरी
आंबे लगडलेले होते..
काही उघड
काही पाना आड़
बेमालूम असे
दडलेले होते..!!
काही पिकलेले
झुळकीवर
पडलेले
कुठे खरचटलेले
परंतु चवीस
चांगलेच
गोड होते..
तसेच काही
अकाली घरंगळलेले
उन्हाच्या तापने
पिकलेसे भासणारे
परंतु चवीस
मात्र अजूनही
आंबट होते..!!
मनाच्या घळीने
मी निवडले
त्या झाडावरचे
काहीसे
चांगले भासणारे
निवडक आंबे..
घातले अडीस
वाटले निपजतील
अविट गोडीचे
परंतु भ्रम होता
निघाले त्यातील काही
तसेच डागाळलेले
कुसके नासके
आंबट चिंबट
आंबे..!!
***सुनिल पवार....
झुळकीवर
पडलेले
कुठे खरचटलेले
परंतु चवीस
चांगलेच
गोड होते..
तसेच काही
अकाली घरंगळलेले
उन्हाच्या तापने
पिकलेसे भासणारे
परंतु चवीस
मात्र अजूनही
आंबट होते..!!
मनाच्या घळीने
मी निवडले
त्या झाडावरचे
काहीसे
चांगले भासणारे
निवडक आंबे..
घातले अडीस
वाटले निपजतील
अविट गोडीचे
परंतु भ्रम होता
निघाले त्यातील काही
तसेच डागाळलेले
कुसके नासके
आंबट चिंबट
आंबे..!!
***सुनिल पवार....
No comments:
Post a Comment