Thursday, 2 June 2016

II रात्रीच्या एकांतास II

।। शुभ रात्री मित्रहो..खुश रहा ।।
====================
रात्रीच्या एकांतास
चंद्राचा सहारा..
चंद्राच्या सहाऱ्यास
चांदणीचा किनारा..!!

चांदणीच्या किनाऱ्यास
शितलतेचा साज..
शितलतेच्या साजास
निद्रेचा बाज..!!
निद्रेच्या बाजास
स्वप्नांची आरास..
स्वप्नांच्या अरासास
साक्षात्काराचा ध्यास..!!
😊*************😊
***काव्यचकोर***

No comments:

Post a Comment