|| पाश ||
=◆=◆=◆=
चित्कारीत कुठे
राख उडून गेली
गुंतल्या मनाचे
पाश तोडून गेली.!!
=◆=◆=◆=
चित्कारीत कुठे
राख उडून गेली
गुंतल्या मनाचे
पाश तोडून गेली.!!
लाविले जगाने
बोल जगी जगताना..
त्यांच्याच मुखी
शब्द खोडून गेली..!!
विरुन गेला
नाद ब्रह्मानंदीचा..
भरला तो चुडा
हिरवा फ़ोडून गेली..!!
कोण होते ते
गोतावळे सभोवती
आसवे ढाळीत
हात जोडून गेली..!!
वेडा होता उगा
अट्टाहास परंतु..
प्राणपाखरे पिंजरा
सोडून गेली..!!
*****सुनिल पवार
बोल जगी जगताना..
त्यांच्याच मुखी
शब्द खोडून गेली..!!
विरुन गेला
नाद ब्रह्मानंदीचा..
भरला तो चुडा
हिरवा फ़ोडून गेली..!!
कोण होते ते
गोतावळे सभोवती
आसवे ढाळीत
हात जोडून गेली..!!
वेडा होता उगा
अट्टाहास परंतु..
प्राणपाखरे पिंजरा
सोडून गेली..!!
*****सुनिल पवार

No comments:
Post a Comment