Thursday, 2 June 2016

|| वाजे वाऱ्याची संदल ||

वाजे वाऱ्याची संदल...

वाजे वाऱ्याची संदल
नका तोडू हो जंगल..
काय म्हणती पाखरं
ऐका वाणी किलबिल..!!
आम्ही रानाची पाखरं
रानी आमचे हे घर..
तोची उदर निर्वाह
फुला फळांचा बहर..!!
ओल्या भूमीचा आधार
वन आणि वनचर..
पावसाच्या अगमना
असे रान उपचार..!!
जपा हिरव्या सृष्टीस
साधा हरित विकास..
वृक्षाविना रे मानवा
सृष्टी होईल भकास..!!
--सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment