Thursday, 2 June 2016

|| कुऱ्हाड ||

|| कुऱ्हाड ||
========
बैलास नांगरास
जुंपतात
तसं तुलाही
जुंपता आलं तर..?
तर तुलाही तसंच
राबवलं असतं
मी जुंपुन शेतात
दिवसभर..
सिंचलं असतं
शिवार वरचेवर..!!

बांधलं असतं
तुला भी
तसंच वाड्याच्या
खुंटयाला अन्
हवं तसं
फिरवलं असतं
गरगरा
गाव पाड्यात
तळी पाणवठ्यात
अन्
वैराण वस्तीवर..!!
वेसण बांधली असती
तुझ्या नाकात
ठेचलं असत
तुझ्या मग्रुरीला
बंधन आलं असतं
मग आपसुक
तुझ्या बेताल
वागण्यावर
मोकाट वाऱ्यावर
उधळण्यावर..!!
नुसत्याच कल्पना
आहेत साऱ्या
ठावुक आहे
तू टिकणार नाहीस
तरीही
कदाचित..
कारण
आम्हीच चालवली
स्वार्थाची कुऱ्हाड
ह्या फुलणाऱ्या
सृष्टीवर
त्या हिरव्या
जंगलावर
अन्
पर्यायाने
तुझ्या, आमच्या
अस्तित्वावर..!!
***सुनिल पवार...

No comments:

Post a Comment