Thursday, 2 June 2016

|| कुठे भेटेल माणूस ||

|| कुठे भेटेल माणूस ||
==============
मी शोधतोय त्याला, जातीत दिशा दाही..
कुठे भेटेल माणूस, कुणी सांगत नाही..!!
कालपर्यंत होता, दिवा मंदिरात तेवत..
ख़ाक झाली ती वात, कुठे आरतीत नाही..!!
कोंबड्याची बांग ती, होती सुरेख अजान..
फुंकले कान कोणी, कळले नमाजात नाही..!!
कबूली जवाब सच्चा, कोण देतोय कोणास..
निःस्वार्थी पाद्री, गिरिजाघरात नाही..!!
दिली जगा त्यांनी, शांतीची अमोल दीक्षा..
लीनता तशी ती कुठे, अनुयायात नाही..!!
सारेच सिकंदर, जग जिंकण्यास निघाले..
प्रजाहितैशी पुरू, कोणी रणात नाही..!!
आंधळीच चाले, जगी श्रेष्ठतेची लढाई..
दृष्टीभ्रम सारा, दोष माणसात नाही..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*****सुनिल पवार....

No comments:

Post a Comment