Monday, 23 April 2018
|| सर्वार्थ साधनम ||
|| सर्वार्थ साधनम ||
===========
किती करावे उगा
शब्द ते आत्मसात..
शब्दांनीच होतसे
मन हे भस्मसात..??
===========
किती करावे उगा
शब्द ते आत्मसात..
शब्दांनीच होतसे
मन हे भस्मसात..??
किती जोपासावे ते
शब्द कुरवाळत..
का शब्दांनी चालावे
सत्यार्थास टाळत..??
शब्द कुरवाळत..
का शब्दांनी चालावे
सत्यार्थास टाळत..??
किती तासावे बरे
शब्द सहाणेवर..
ती धार धार सूरी
फिरते मानेवर..!!
शब्द सहाणेवर..
ती धार धार सूरी
फिरते मानेवर..!!
किती पाहावे असे
शब्द रे आरशात..
प्रतिबिंब तयाचे
उमटते पाण्यात..!!
शब्द रे आरशात..
प्रतिबिंब तयाचे
उमटते पाण्यात..!!
घेतला ना सोडला
शब्द ना मी खोडला..
सर्वार्थ साधनम
मौन त्यास जोडला..!!
***सुनिल पवार..
✍🏼
शब्द ना मी खोडला..
सर्वार्थ साधनम
मौन त्यास जोडला..!!
***सुनिल पवार..

|| गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ||
तरंग is with स्वच्छंदाचे छंद and सुनिल पवार.
|| गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ||
=======================
मांगल्याचे तोरण
घरा दारावर सजावे..
=======================
मांगल्याचे तोरण
घरा दारावर सजावे..
यशाची गुढी
उंच गगनी भिडावी..
उंच गगनी भिडावी..
कीर्तीची पताका
वाऱ्यावर लहारावी..
वाऱ्यावर लहारावी..
साखरेची गोडी
नित्य ओठी रुजावी..
नित्य ओठी रुजावी..
आकांक्षेच्या आसमंती
नव पहाट व्हावी..
नव पहाट व्हावी..
स्वप्नांच्या किरणांनी
जीवनवाट सुकर व्हावी..!!
****सुनिल पवार...
✍🏼
जीवनवाट सुकर व्हावी..!!
****सुनिल पवार...

|| अन्यथा ||
|| अन्यथा ||
=======
थोपवावे वाटते
आसवांचे नभांगण
दूर भिरकावे वाटते
आशंकीत मनाचे मळभ
सूर्यास अंगीकारून
वाटते
लख्ख प्रकाशित व्हावे..!!
थोपवावे वाटते
आसवांचे नभांगण
दूर भिरकावे वाटते
आशंकीत मनाचे मळभ
सूर्यास अंगीकारून
वाटते
लख्ख प्रकाशित व्हावे..!!
पण
राहू दे परिस्थिती जैसे थै
निदान
धूसर झाल्या बाहुल्या
पुन्हा लख्ख उजळून निघतील
अन
वाहिलेल्या पाण्यातून
होईल एखादी नवनिर्मिती
साक्षी असेन त्यास
मीही अन तुही..!!
राहू दे परिस्थिती जैसे थै
निदान
धूसर झाल्या बाहुल्या
पुन्हा लख्ख उजळून निघतील
अन
वाहिलेल्या पाण्यातून
होईल एखादी नवनिर्मिती
साक्षी असेन त्यास
मीही अन तुही..!!
तरीही
तू आता इतकेच उपकार कर
की नवनिर्मितीच्या या प्रक्रियेत
फुलेल एखादी नवी कळी
तेव्हा मात्र
तिला अकाली खुडू नको
अन्यथा
आलेल्या पुरात
सर्वस्व वाहून जाईल
अगदी तुझ्यासकट
जरा इतकेच ठेव तू ध्यानात..!!
***सुनिल पवार...
✍🏼
तू आता इतकेच उपकार कर
की नवनिर्मितीच्या या प्रक्रियेत
फुलेल एखादी नवी कळी
तेव्हा मात्र
तिला अकाली खुडू नको
अन्यथा
आलेल्या पुरात
सर्वस्व वाहून जाईल
अगदी तुझ्यासकट
जरा इतकेच ठेव तू ध्यानात..!!
***सुनिल पवार...

|| विचार शृंखला ||
|| विचार शृंखला ||
==========
मारणाऱ्यास अडवता येते
पण बोलणाऱ्याचे काय?
पांगळाच समजावं त्याला
त्यास नसतात हात पाय..!!
मारणाऱ्यास अडवता येते
पण बोलणाऱ्याचे काय?
पांगळाच समजावं त्याला
त्यास नसतात हात पाय..!!
एकाने मारली गाय म्हणून
दुसऱ्याने का वासरू मारावे..?
अपेक्षांच्या मतलबी तराजूत
निपक्ष दान कोणी करावे..??
दुसऱ्याने का वासरू मारावे..?
अपेक्षांच्या मतलबी तराजूत
निपक्ष दान कोणी करावे..??
क्रियेच्या प्रत्येक कृतीवर
प्रतिक्रिया पाऊल उमटवत जाते..
सुडाग्नीच्या दग्ध भावनेत
कोवळे मन पोळत जाते...!!
प्रतिक्रिया पाऊल उमटवत जाते..
सुडाग्नीच्या दग्ध भावनेत
कोवळे मन पोळत जाते...!!
शब्दाला पकडून धरता
नकळत त्यास अहम चिकटतो..
शब्दांसोबत चालणारा मग
शब्दांनीचं दिशाहीन भटकतो..
नकळत त्यास अहम चिकटतो..
शब्दांसोबत चालणारा मग
शब्दांनीचं दिशाहीन भटकतो..
आरशात पाहणाऱ्यालाही कधी
पाण्यात पाहण्याचा मोह होतो..
आपल्याच नितळ चेहऱ्यास तो
गढूळ, विखारी डोह करतो..!!
पाण्यात पाहण्याचा मोह होतो..
आपल्याच नितळ चेहऱ्यास तो
गढूळ, विखारी डोह करतो..!!
विचार मात्र प्रत्येकजण करतो
पण कृतीचाचं अभाव दिसतो..
आणि दिसणाऱ्या प्रत्येक कृतीत
केवळ स्वार्थाचाचं प्रभाव दिसतो..!!
***सुनिल पवार...
✍🏼
पण कृतीचाचं अभाव दिसतो..
आणि दिसणाऱ्या प्रत्येक कृतीत
केवळ स्वार्थाचाचं प्रभाव दिसतो..!!
***सुनिल पवार...

|| खेळ रंगला ||
**चित्रकाव्य**
|| खेळ रंगला ||
========
खेळ रंगला दोन घडीचा
घ्या स्नेहाचे भरून दान..
कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ
हवा कशास दुराभिमान..!!
========
खेळ रंगला दोन घडीचा
घ्या स्नेहाचे भरून दान..
कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ
हवा कशास दुराभिमान..!!
कोण अल्ला कोण राम?
कोणते तुझे निजधाम..?
माणसाच्या माणुसकीला
लाभू दे निर्भेळ आयाम..!!
कोणते तुझे निजधाम..?
माणसाच्या माणुसकीला
लाभू दे निर्भेळ आयाम..!!
अंतरातल्या या रक्ताचा
रंग असतो केवळ लाल..
भिन्न दिसे मात्र पेहराव
बाकी मातीचीच सारी बाळं..!!
रंग असतो केवळ लाल..
भिन्न दिसे मात्र पेहराव
बाकी मातीचीच सारी बाळं..!!
एकच रंग माणुसकीचा
आपण रंगावे त्या रंगात..
बाकी रंग ते सारे झूट
इतकेच राहू द्या ध्यानात..!!
***सुनिल पवार...
✍🏼
आपण रंगावे त्या रंगात..
बाकी रंग ते सारे झूट
इतकेच राहू द्या ध्यानात..!!
***सुनिल पवार...

|| गेलो होतो रानात ||
गेलो होतो रानात..
गेलो होतो रानात
मोर भरला मनात..
मी म्हणालो त्याच्या कानात
नाच आंब्याच्या बनात..
मोर म्हणाला नको,नको
काळा पडेन मी उन्हात..!!
गेलो होतो रानात
मोर भरला मनात..
मी म्हणालो त्याच्या कानात
नाच आंब्याच्या बनात..
मोर म्हणाला नको,नको
काळा पडेन मी उन्हात..!!
गेलो होतो रानात
ससा दिसला बिळात..
मी म्हणालो त्याच्या कानात
चल शर्यत लावू जोरात..
ससा म्हणाला नको,नको
घेरी येईल ना उन्हात..!!
ससा दिसला बिळात..
मी म्हणालो त्याच्या कानात
चल शर्यत लावू जोरात..
ससा म्हणाला नको,नको
घेरी येईल ना उन्हात..!!
गेलो होतो रानात
माकड होते झाडात..
मी म्हणालो त्याच्या कानात
झोके घेऊ आनंदात..
माकड म्हणाला नको,नको
कायली झालीय रे उन्हात..!!
माकड होते झाडात..
मी म्हणालो त्याच्या कानात
झोके घेऊ आनंदात..
माकड म्हणाला नको,नको
कायली झालीय रे उन्हात..!!
गेलो होतो रानात
त्राण दिसेना कोणात..
आंबा दिसला पाडात
आणि कोडे सुटले क्षणात..
आमरसाच्या स्वादाने
मोद फुलला उन्हात..!!
--सुनिल पवार..
✍🏼
त्राण दिसेना कोणात..
आंबा दिसला पाडात
आणि कोडे सुटले क्षणात..
आमरसाच्या स्वादाने
मोद फुलला उन्हात..!!
--सुनिल पवार..

|| मनाची पानं ||
|| कोण असा ||
|| कोण असा ||
=========
कोण असा रंग भरतो
सांजवेळी क्षितीजात..?
ही कोणती कातरवेळ
पुसून जाते निमिषात..!!
=========
कोण असा रंग भरतो
सांजवेळी क्षितीजात..?
ही कोणती कातरवेळ
पुसून जाते निमिषात..!!
वाळूवरच्या रेघोट्यांना
कोण रेखितो तळहातात..?
मन रमते का गुंतते
भरती ओहोटीच्या खेळात..!!
कोण रेखितो तळहातात..?
मन रमते का गुंतते
भरती ओहोटीच्या खेळात..!!
ही कोणती पाखरे वेडी
भिरभिरती आसमंतात..?
वाट पाहते घरटे तरीही
लाटेभोवती घुटमळतात..!!
भिरभिरती आसमंतात..?
वाट पाहते घरटे तरीही
लाटेभोवती घुटमळतात..!!
कुणाची ही पाऊले असंख्य
कुठवर जाऊन थांबतात..?
अविरत मारा चंचलतेचा
तटस्थ किनारे झेलतात..!!
कुठवर जाऊन थांबतात..?
अविरत मारा चंचलतेचा
तटस्थ किनारे झेलतात..!!
या वाळूच्या मनोऱ्यात का
स्वप्ने उंच जगाची वसतात..?
आशेच्या छोट्या द्वारातून
निल कवडसे मंद चमकतात..!!
***सुनिल पवार..
✍🏼
स्वप्ने उंच जगाची वसतात..?
आशेच्या छोट्या द्वारातून
निल कवडसे मंद चमकतात..!!
***सुनिल पवार..

Friday, 20 April 2018
|| पण मुद्दा मुळात तो नाही ||
पण मुद्दा मुळात तो नाही..
जायचं होतं पण गेलो नाही..
बोलायचं होतं पण बोललोच नाही..
तुम्ही म्हणाल भित्रा मला
पण मुद्दा मुळात तो नाही..
शक्ती प्रदर्शनाशिवाय,
बाकी त्यात नव्हतंच काही..!!
लिहायचं होतं पण लिहलं नाही..
खोडायचं होतं पण खोडलं नाही..
तुम्ही म्हणाल निरक्षर मला
पण मुद्दा मुळात तो नाही..
एकांगी विपर्यासाशिवाय,
बाकी त्यात नव्हतंच काही..!!
काही करायचं होतं पण केलं नाही..
स्वस्थ बसायचं होतं पण तेही जमलं नाही..
तुम्ही समजाल तटस्थ मला
पण मुद्दा मुळात तो नाही..
निव्वळ स्वार्थाशिवाय,
बाकी त्यात नव्हतंच काही..!!
शेवटी फिरून मुद्दे तिथेच येतात
कुठे दिशाहीन भटकत राहतात
आपलं कोण परकं कोण?
काही काही कळत नाही..
आणि आपल्या विचारांशी सहमत
आपल्या शिवाय कोणीच नाही..!!
--सुनिल पवार...

|| उन्हात मारवा ||
|| उन्हात मारवा ||
गौर कांतीवर तुझ्या
रंग हळदीचा सजावा..
चाफ्याच्या श्वेत पदरी
पित कशिदा शोभावा..!!
तुझ्या सोनझळाळीचा
उन्हासही मोह व्हावा..
तुझा फुललेला बहावा
मी नजरेने टिपावा..!!
उन्हासही मोह व्हावा..
तुझा फुललेला बहावा
मी नजरेने टिपावा..!!
गुलाबी रंगछटांचा
प्रेमास बहर यावा..
खळीदार गालावर
गोड ताम्हण फुलावा..!!
प्रेमास बहर यावा..
खळीदार गालावर
गोड ताम्हण फुलावा..!!
जसा रविबिंब रक्तवर्णी
पूर्वांचली उगवावा..
भाळावरच्या कुंकवात
लाल पांगेरा खुलावा..!!
पूर्वांचली उगवावा..
भाळावरच्या कुंकवात
लाल पांगेरा खुलावा..!!
अंथरलेल्या हृदयावर
घे घडीभर विसावा..
रंगलेल्या गुलमोहराचा
तू मार शिडकावा..!!
***सुनिल पवार...
✍🏼
घे घडीभर विसावा..
रंगलेल्या गुलमोहराचा
तू मार शिडकावा..!!
***सुनिल पवार...

*तिच्यातील ती*
*तिच्यातील ती*
=========
ती म्हणाली :
तुझ्या "तिच्यातील ती" मध्ये
सांग ना, मी कुठे आहे..?
मी म्हणालो :
यत्र तत्र सर्वत्र..!!
=========
ती म्हणाली :
तुझ्या "तिच्यातील ती" मध्ये
सांग ना, मी कुठे आहे..?
मी म्हणालो :
यत्र तत्र सर्वत्र..!!
ती म्हणाली :
हा तर केवळ उपचार मात्र
बाकी काही म्हणा,
तू चांगलेच जुळवलेस तंत्र..
मी म्हणालो :
तंत्र नव्हे गं, हा तर मूलमंत्र..!!
हा तर केवळ उपचार मात्र
बाकी काही म्हणा,
तू चांगलेच जुळवलेस तंत्र..
मी म्हणालो :
तंत्र नव्हे गं, हा तर मूलमंत्र..!!
ती म्हणाली :
उगाच भुरळण्यास
तू शिंपडू नकोस इत्र..?
मी म्हणालो :
त्याची गरज काय?
ते पूर्वपार आहे गं
सर्वांगी सर्वत्र..!!
उगाच भुरळण्यास
तू शिंपडू नकोस इत्र..?
मी म्हणालो :
त्याची गरज काय?
ते पूर्वपार आहे गं
सर्वांगी सर्वत्र..!!
ती म्हणाली :
बरं मला सांग?
ती कितीशी कळली तुला
का नुसतीच मलमपट्टी नाममात्र..?
मी म्हणालो :
ते मी सांगणार नाही
तूच वाचून सांग ना
काय म्हणतात माझे नेत्र..!!
***सुनिल पवार..
✍🏼
बरं मला सांग?
ती कितीशी कळली तुला
का नुसतीच मलमपट्टी नाममात्र..?
मी म्हणालो :
ते मी सांगणार नाही
तूच वाचून सांग ना
काय म्हणतात माझे नेत्र..!!
***सुनिल पवार..

Wednesday, 18 April 2018
Subscribe to:
Posts (Atom)