Monday, 23 April 2018

|| अन्यथा ||

|| अन्यथा ||
=======
थोपवावे वाटते
आसवांचे नभांगण
दूर भिरकावे वाटते
आशंकीत मनाचे मळभ
सूर्यास अंगीकारून
वाटते
लख्ख प्रकाशित व्हावे..!!
पण
राहू दे परिस्थिती जैसे थै
निदान
धूसर झाल्या बाहुल्या
पुन्हा लख्ख उजळून निघतील
अन
वाहिलेल्या पाण्यातून
होईल एखादी नवनिर्मिती
साक्षी असेन त्यास
मीही अन तुही..!!
तरीही
तू आता इतकेच उपकार कर
की नवनिर्मितीच्या या प्रक्रियेत
फुलेल एखादी नवी कळी
तेव्हा मात्र
तिला अकाली खुडू नको
अन्यथा
आलेल्या पुरात
सर्वस्व वाहून जाईल
अगदी तुझ्यासकट
जरा इतकेच ठेव तू ध्यानात..!!
***सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment