Monday, 23 April 2018

|| कोण असा ||


|| कोण असा ||
=========
कोण असा रंग भरतो
सांजवेळी क्षितीजात..?
ही कोणती कातरवेळ
पुसून जाते निमिषात..!!
वाळूवरच्या रेघोट्यांना
कोण रेखितो तळहातात..?
मन रमते का गुंतते
भरती ओहोटीच्या खेळात..!!
ही कोणती पाखरे वेडी
भिरभिरती आसमंतात..?
वाट पाहते घरटे तरीही
लाटेभोवती घुटमळतात..!!
कुणाची ही पाऊले असंख्य
कुठवर जाऊन थांबतात..?
अविरत मारा चंचलतेचा
तटस्थ किनारे झेलतात..!!
या वाळूच्या मनोऱ्यात का
स्वप्ने उंच जगाची वसतात..?
आशेच्या छोट्या द्वारातून
निल कवडसे मंद चमकतात..!!
***सुनिल पवार..✍🏼

No comments:

Post a Comment