Monday, 23 April 2018

|| विचार शृंखला ||

|| विचार शृंखला ||
==========
मारणाऱ्यास अडवता येते
पण बोलणाऱ्याचे काय?
पांगळाच समजावं त्याला
त्यास नसतात हात पाय..!!
एकाने मारली गाय म्हणून
दुसऱ्याने का वासरू मारावे..?
अपेक्षांच्या मतलबी तराजूत
निपक्ष दान कोणी करावे..??
क्रियेच्या प्रत्येक कृतीवर
प्रतिक्रिया पाऊल उमटवत जाते..
सुडाग्नीच्या दग्ध भावनेत
कोवळे मन पोळत जाते...!!
शब्दाला पकडून धरता
नकळत त्यास अहम चिकटतो..
शब्दांसोबत चालणारा मग
शब्दांनीचं दिशाहीन भटकतो..
आरशात पाहणाऱ्यालाही कधी
पाण्यात पाहण्याचा मोह होतो..
आपल्याच नितळ चेहऱ्यास तो
गढूळ, विखारी डोह करतो..!!
विचार मात्र प्रत्येकजण करतो
पण कृतीचाचं अभाव दिसतो..
आणि दिसणाऱ्या प्रत्येक कृतीत
केवळ स्वार्थाचाचं प्रभाव दिसतो..!!
***सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment