गौर कांतीवर तुझ्या
रंग हळदीचा सजावा..
चाफ्याच्या श्वेत पदरी
पित कशिदा शोभावा..!!
तुझ्या सोनझळाळीचा
उन्हासही मोह व्हावा..
तुझा फुललेला बहावा
मी नजरेने टिपावा..!!
उन्हासही मोह व्हावा..
तुझा फुललेला बहावा
मी नजरेने टिपावा..!!
गुलाबी रंगछटांचा
प्रेमास बहर यावा..
खळीदार गालावर
गोड ताम्हण फुलावा..!!
प्रेमास बहर यावा..
खळीदार गालावर
गोड ताम्हण फुलावा..!!
जसा रविबिंब रक्तवर्णी
पूर्वांचली उगवावा..
भाळावरच्या कुंकवात
लाल पांगेरा खुलावा..!!
पूर्वांचली उगवावा..
भाळावरच्या कुंकवात
लाल पांगेरा खुलावा..!!
अंथरलेल्या हृदयावर
घे घडीभर विसावा..
रंगलेल्या गुलमोहराचा
तू मार शिडकावा..!!
***सुनिल पवार...
✍🏼
घे घडीभर विसावा..
रंगलेल्या गुलमोहराचा
तू मार शिडकावा..!!
***सुनिल पवार...

No comments:
Post a Comment