Monday, 23 April 2018

|| खेळ रंगला ||

**चित्रकाव्य**
|| खेळ रंगला ||
========
खेळ रंगला दोन घडीचा
घ्या स्नेहाचे भरून दान..
कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ
हवा कशास दुराभिमान..!!
कोण अल्ला कोण राम?
कोणते तुझे निजधाम..?
माणसाच्या माणुसकीला
लाभू दे निर्भेळ आयाम..!!
अंतरातल्या या रक्ताचा
रंग असतो केवळ लाल..
भिन्न दिसे मात्र पेहराव
बाकी मातीचीच सारी बाळं..!!
एकच रंग माणुसकीचा
आपण रंगावे त्या रंगात..
बाकी रंग ते सारे झूट
इतकेच राहू द्या ध्यानात..!!
***सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment